नागपूर शहर: सक्करदरा पोलिसांची मोठी कारवाई: गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक
7 जुलैला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या पथकाने गांजा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, त्यांना सक्करदरा लेक गार्डनच्या भिंतीजवळ, फुटपाथवर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याने आपले नाव विजय देवानंद ताजने असे सांगितले.त्याच्या पिशवीत ७३ प्लास्टिक पाउचमध्ये ४४४ ग्रॅम गांजा मिळून आला.