भोकरदन: कर्ज वसुली थांबवा नसता शिवसेना स्टाईल मध्ये सांगू,नाना वानखेडे यांचा खडकी गावात वसुलीसाठी आलेल्या फायनान्स वाल्यांना इशा
आज दिनांक 19 ऑक्टोंबर 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील खडकी येथे फायनान्स वसुलीसाठी आलेल्या वसुली कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना थेट मंदिरावर बोलवत इशारा दिला आहे की सध्या दुष्काळी परिस्थिती आहे सरकारने सर्व वसुल्या बंद करण्याचे आदेश दिले आहे सरकारी आदेशाचे पालन करा नसता शिवसेना स्टाईल मध्ये आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करायला लावू असा दम शिवसेना भोकरदन तालुका अध्यक्ष नाना वानखेडे यांनी संबंधित फायनान्स अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिला आहे.