समुद्रपूर: गिरड येथील फरीदबाबा दर्गाह टेकडीवर घोडेस्वारच्या पैशातून भाविक व दुकानदारांमध्ये तुफान राडा, पोलिसांत गुन्हा दाखल
समुद्रपुर: तालुक्यातील गिरड येथील फरीदबाबा दर्गाह टेकडीवर घोडेस्वारच्या पैशातून उमरेड येथील भाविक व दुकानंदामध्ये तुफान राडा झाला यामध्ये दोन्ही गटातील ३ जण गंभीर तर एक किरकोळ जखमी आहे.यासंबंधी पोलिसांनी दोन्ही गटातील ८ जणा विरोधात गुन्हा दाखल केला.यावेळी पोलिसांच्या प्रसंगअनवधानाने मोठा अनर्थ टळला. यामध्ये गिरड येथील नईम काजी व कृष्णा कामडी या दोघांच्या जबर मार लागून गंभीर जखमी झाले तर उमरेड येथील कुणाल कटारे ,रजत कटारे हे सुद्धा जखमी झाले. पुढील तपास पोलीस करीत आहे.