समुद्रपूर: १ वर्षापासून लो व्होल्टेजच्या समस्येला वैतागून जाम वासी आक्रमक; तातडीने समस्या दूर करण्याची महावितरण कंपनीकडे मागणी
समुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम येथील नागरिक गेल्या १ वर्षापासून लो व्होल्टेजच्या समस्येला वैतागले असुन पुर्ण होल्टेज मिळत नसल्याने अनेक नागरीकांचे टि.व्ही, कुलर, इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून नुकसान झाले आहे.तसेच घरचे कुलर, पंखे एसी काम करीत नसल्याने नागरीकांना भर उन्हाच्या दिवसात गर्मी सहन करावा लागत आहे.याकडे तातडीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.