समुद्रपूर: मेनखात वाळू घाटावरील अवैध वाळू वाहतुकी विरोधात महसूल विभाग ॲक्शन मोडवर: जेसीबीने नाली खोदून रस्ता केला बंद
समुद्रपुर:तालुक्यातील मेनखात वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपासा करून वाहतूक होत असल्याची तक्रार तहसीलदार कपिल हाटकर यांना प्राप्त होताच महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला असून चक्क घाटावर जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने मोठी नाली खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे.अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभाग लक्ष ठेवून असुन अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार कपिल हाटकर यांनी सांगितले आहे.