करवीर: कणेरीवाडी,मोरेवाडी व माणगाववाडी येथील हातभट्टीची दारू तयार करणारे 7 अड्डे उध्वस्त; 3 लाख 21 हजार 800 रु मुद्देमाल जप्त
कंजारभाट वसाहत साईनगर कणेरीवाडी, कंजर भाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर व माणगाव वाडी तालुका हातकणंगले येथील हातभट्टीची दारू तयार करणारे सात अड्डे उध्वस्त करून एकूण तीन लाख 21 हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.