लातूर: लाखो वृक्षांनी फुलेल लातूर–मनपा आयुक्त मानसी यांचा लातूर शहरात “एक विद्यार्थी-एक वृक्ष” संकल्प
Latur, Latur | Oct 9, 2025 लातूर-लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकाराने “एक विद्यार्थी – एक वृक्ष” हा उपक्रम आजपासून जोरात राबविण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभाग लातूर यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले जात आहेत.दुपारी तीन वाजता लातूर शहरातील ३५० शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला एक वृक्ष देण्यास सुरुवात झाली असून, मिळून सुमारे १,२०,००० वृक्ष विद्यार्थ्यांकडे पोहोचणार आहेत.