नागपूर शहर: नागपुरात अमली पदार्थ विरोधी कारवाई ; गांजासह आरोपी जेरबंद: शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 1 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन थंडर' मोहिमेअंतर्गत नागपूर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट २ ने मोठी कारवाई केली आहे. गिट्टीखदान हद्दीतील गोरेवाडा रोडवर सापळा रचून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.