नागपूर शहर: सुवर्ण हाऊसिंग सोसायटीत भूखंडाची दोनदा विक्री; माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर गुन्हा दाखल: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दोन मे ला दुपारी तीन वाजता दिलेल्या माहितीनुसार शहरात फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सुवर्ण हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच भूखंडाची दोनदा विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सोसायटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेपे आणि विद्यमान अध्यक्ष विनोद पराते यांच्यावर संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.