देवळाली गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीसाठी पोलीस आले असता पोलीस व नागरिकांमध्ये मोठा गोंधळ व तणाव निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून या कॅमेऱ्यांवरून राजकारण तापले असून, सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांचे आयडी व पासवर्ड देण्याची मागणी पोलिसांनी केली. घटनास्थळी माजी आमदार योगेश घोलप यांनीही उपस्थित राहून पोलिसांना जाब विचारला. तपासणीत कॅमेऱ्यांना इंटरनेट किंवा एलईडी जोडणी नसल्याचे स्पष्ट झाल्याने कोणताही गैरप्रकार नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.