मिरज: नाशिक येथील कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊ नये;सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांचे आव्हान
Miraj, Sangli | Aug 30, 2025 नाशिक येथे हौशी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे किशोर / किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा होत आहेत. आयोजक संस्था ही महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला संलग्न नाही. त्या संघटनेला राज्य कबड्डी असोसिएशनने स्पर्धा आयोजनाची मान्यता दिलेली नाही. त्यामुळे या अनधिकृत स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग घेऊ नये, असे आवाहन सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांनी केले आहे. ही स्पर्धा राज्य कबड्डी असोसिएशनने अनधिकृत घोषित केलेली आहे. या अनधिकृत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या