अलिबाग: तलाव, नदीतील गोड्या माशांना भाव
Alibag, Raigad | Jun 5, 2026 सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. तीव्र उन्हामुळे नदी, तलाव, धरणे आणि पाणवठे यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर आटले आहे. या आटलेल्या पाण्यात आता गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात सुरू झाली आहे. पाणी कमी झाल्यामुळे विविध प्रकारचे चविष्ट गोडे मासे मोठ्या प्रमाणात हाती लागत असून, ते बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या या दिवसांत खवय्यांच्या उड्या आता चविष्ट गोड्या पाण्यातील माशांवर पडत असून बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.