भंडारा: भंडारा नगरपरिषद निवडणुकीची आकडेवारी! ४१.९९% मतदान; अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा
भंडारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीच्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून, भंडारा जिल्ह्याने दुपारी ०३:३० वाजेपर्यंत ४१.९९% मतदानाची नोंद केली आहे. ०२/१२/२०२५ रोजी झालेल्या मतदानामध्ये, एकूण ८५,६०८ मतदारांपैकी ३५,९५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १७,१७८, तर स्त्री मतदारांची संख्या १८,७७२ इतकी होती. सायंकाळपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी, संबंधित निवडणूक विभागाच्या वतीने मतदानाची पूर्ण आणि अंतिम आकडेवारी दिनांक 2 डिसेंबर