नागपूर शहर: रवी नगर परिसरात भीषण रस्ते अपघात; झाडावर आदळली भरधाव कार
शहरातील रवी नगर परिसरात एक भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एक भरधाव कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी कारचे एअरबॅग्ज वेळेवर उघडल्यामुळे चालकाचा जीव वाचला आहे. या अपघातात चालक बालंबाल बचावला असून, त्याला कोणतीही गंभीर दुख