जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून वाशिममध्ये उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेमुळे शहरातील करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल ८० लाख रुपयांहून अधिक कर वसूल झाल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे