नागपूर शहर: पाचपावली पोलिसांकडून एम.डी. ड्रग्जसह दोघांना अटक; २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
5 एप्रिल ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन थंडर' मोहिमेअंतर्गत पाचपावली पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अटक केली आहे. ही कारवाई वैशालीनगर परिसरातील रेल्वे लाईनजवळ करण्यात आली.अटक केलेले आरोपी शेख आदिल शेख रशीद आणि आशिष सागर रामटेके हे आहे. आरोपीकडून १२.४९ ग्रॅम एम.डी., दोन मोबाईल, रोख रक्कम आणि एक दुचाकी, असा एकूण २,१३,०२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.