ठाणे: नेरूळ मधील भूमिपुत्रांनी नवी मुंबई विमानतळ नाव असलेले घेतले काढून
Thane, Thane | Oct 1, 2025 सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून चांगलाच वाद पेटलेला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी आंदोलने देखील अनेक वेळा करण्यात आलेली आहेत,मात्र अद्याप पर्यंत तसे फलक लावले नसल्यामुळे भूमिपुत्र संतप्त होत आहेत अनेक ठिकाणी नवी मुंबई विमानतळ असा बोर्ड असला तर तो काढून फेकला जात आहे.तसेच भूमिपुत्र या विरोधात आक्रमक होत आहे. नेरूळ येथे नवी मुंबई विमान नाव असलेला बोर्ड काढून फेकला आहे.