समुद्रपूर: लाला नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे पाच सेंटीमीटरने उघडले, १२.१२ घनमीटर पाण्याचा विसर्ग; झूनका धरण ओव्हरफ्लो
समुद्रपुर :तालुक्यात सलग १४ तासापासुन सुरु असलेल्या संततधार पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील जवळपास २० गावांचा मुख्य मार्गांवरील संपर्क तुटला आहे.तर शनिवारी २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे ५ सेंटीमिटरने उघडण्यात आले असून १२.१२ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.झूनका धरण १०० टक्के भरल्याने ओव्हरफ्लो मोठ्या प्रमाणात सुरु आहे. नदी नाल्या काठच्या गावांचा संपर्क मुख्य गावांशी तुटला असून नागरिकांनी सर्तकतेचा इशारा प्रशासकडून देण्यात आला आहे.