हवेली: शेअर मार्केटच्या नादाने ३७ लाख गमावले; चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकाची मोठी फसवणूक
Haveli, Pune | Nov 29, 2025 ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची ३७ लाखांहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान तानाजीनगर, चिंचवड येथे घडली.