नागपूर शहर: कुख्यात चोरटा सूरज तोडासे जेरबंद; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त: विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 4 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट ५ ने सापळा रचून कुख्यात गुन्हेगार सूरज विनोद तोडासे याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोपेड, असा एकूण ३,४८,४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सूरज आणि त्याचा फरार साथीदार इरफान अंसारी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर बालपणापासून अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह ताब्