नागपूर शहर: धक्कादायक! नागपूर मेडिकलमध्ये तृतीयपंथीयाची आत्महत्या; बँडेज पट्टीने लावला गळफास
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका तृतीयपंथीयाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी 7 ते 8 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ माजली आहे.राधिका मोहन जाधव असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघातात राधिकाने आपला एक पाय गमावला होता. तेव्हापासून ती मेडिकलमध्ये उपचार घेत होती.