समुद्रपूर: मांडगावात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंडन आंदोलन
समुद्रपुर तालुक्यातील मांडगाव येथे माजी राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंडन आंदोलनात करून सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात राजू चुटे, प्रमोद चन्ने , लिलेश्वर पाहुणे, राजू मेंढे, हेमंत पाहुणे, विलास ढवळे, सतीश चौधरी, मनीष पिसुड्डे, प्रकाशराव तडस, राजूभाऊ तडस, रोशन भोयर ,संजय काटवले, केशव तिमांडे यांनी मुंडन आंदोलन करून राज्यकर्त्यांचा निषेध व्यक्त केला