नागपूर शहर: नागपुरात घरफोडी; घरातून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास, पीडितने केली न्यायाची मागणी
12 मे ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मशीद अख्तर रजा परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख रुपयांहून अधिकच्या ऐवजावर डल्ला मारला.चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे आणि एक मौल्यवान लॅपटॉप लंपास केला आहे. विशेष म्हणजे, चोरी गेलेल्या लॅपटॉपमध्ये जुबैर यांच्या ५ वर्षांच्या मेहनतीचा महत्त्वाचा डेटा असून, तो परत मिळवण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे टाहो फोडला आहे.