जय माँ शीतला मंदिराच्या वतीने आयोजित या भव्य कलश यात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुमारे १३०० ते १५०० महिलांनी या यात्रेत भाग घेतला. यात्रा बिलालपाडा मार्गे गौराईपाडा होऊन शीतला माता मंदिरापर्यंत पार पडली. भक्तिभावाने आणि उत्साहाने भरलेल्या या सोहळ्याने आपल्या सांस्कृतिक परंपरेला चालना दिली तसेच सामाजिक एकतेचा संदेशही अधोरेखित केला.