लातूर: लातुरात प्रचंड पावसातही दोन युवतींनी केला मारवाडी स्मशानभूमीत बेवारस महिलेचा अंत्यविधी
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर -जात-धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन सेवा आधार संस्था समाजात माणुसकीचे उदाहरण जिवंत ठेवत आहे. या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अंकिता मोटे व भक्ती होणाळे या दोन युवती संस्थेच्या कार्यात सहभागी झाल्या आहेत.गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना एका 75 वर्षांच्या महिलेचे निधन दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी झाले.