औंढा नागनाथ तालुक्यात सध्या प्रधानमंत्री, रमाई व शबरी घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर हाप्ते पडत नसल्याने ही योजना पूर्णपणे ठप्प झाली आहे तसेच चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करत नाहीत त्यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांनी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात दिनांक चार डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समिती प्रशासनाला निवेदन दिले आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते घरकुल लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती