समुद्रपूर: नवीन बस स्थानक परिसरातील जुगार अड्ड्यावर समुद्रपूर पोलिसांची धाड, १ लाख ३९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपुर :पोलिसांनी नविन बस स्थानक परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून याठिकाणावरुन १ लाख ३९ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत ७ जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना शहरातील नविन बस स्थानक परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनीज्ञ सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आपल्या कर्मचाऱ्यांसह याठिकाणी धाड टाकली यावेळी ७ जण जुगार खेळताना आढळून आले.