समुद्रपूर: गिरड येथील जिल्हा परिषद मुलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून टेकळी परीसरात केली ३ हजार सिडबॉलची लागवड
गिरड परीसरात मगन संग्रहालय समिती वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी १ लाख वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून याच अनुषंगाने ११ वाजता गिरड येथील जिल्हा परिषद मुलींगीचा शाळा येथिल विद्यार्थ्यांनी शाळेपासून बाबा फरीद दरगाह टेकडी पर्यंत वृक्ष दिंडी काढुन टेकडी परिसरात ३ हजार सिडबॉलची लागवड केली यावेळी मगन संग्रहालय समिती गिरड येथील प्रकल्प समन्वयक गजाननजी गारघाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे आदिंसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.