Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: *संत बाळाभाऊ महाराजांच्या प्रणव अवतार महोत्सवास सुरुवात.

Mehkar, Buldhana | Jan 16, 2026
मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर मठाच्या परिसरात संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांच्या ९६ व्या प्रणव अवतार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान सद्गुरु ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या सान्निध्यात १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान या महोत्सवात कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, पालखी मिरवणूक, महाप्रसाद, आरोग्य शिबीर आदि भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. विदर्भात वारकरी संप्रदायाचे बीजारोपण करणारे संत बाळाभाऊ महाराज यांचे मेहकर हे जन्मस्थळ आणि गुरुपीठ आहे. मेहकरच्या अधिष्ठानाच्या उत्सवासह हा महोत्सव देशभरात ३४ ठिकाणी साजरा होतो. या महोत्सवात हभप कृष्णा महाराज शास्त्री (मुंदेफळ), तुकाराम महाराज सखारामपूरकर, प्रा.अभिजीत महाराज देशमुख (बुलडाणा), गोपाल महाराज पितळे (मेहकर) यांची कीर्तने आयोजित केली आहेत.