अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी कपाशीची सुमारे 650 क्विंटल आवक झाली तर हीच आवक 18 डिसेंबर रोजी 345 क्विंटल 17 डिसेंबर रोजी 520 क्विंटल तर 16 डिसेंबर रोजी 410 क्विंटल होती दरम्यान सोमवारी थेट 650 क्विंटल आवक झाल्याने नजिकच्या दिवसांमध्ये कपाशीची आणखी मोठी आवक होण्याची चिन्हे बाजार समितीच्या सूत्रांच्या वतीने व्यक्त होत आहे.