नागपूर शहर: गुमथळ्यात धाडसी चोरी; घरासमोरून पल्सर दुचाकी लंपास, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद
खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुमथळा येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी मोठी चोरी केली. बैलवाडा मार्गाने गावात शिरलेल्या चार चोरट्यांनी मयूर गागाटे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून नेली.चोरटे दोन दुचाकींवरून आले होते. पहिल्या दुचाकीवरील दोघांनी रेकी केली, तर त्यांच्या मागे आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी क्षणात पल्सर चोरून पळ काढला.