जालना: नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेविका सायरा फखरूल्ला खान यांचा पुढाकार
नॅशनल नगरसह चार परिसरात डास प्रतिबंधक फवारणी
Jalna, Jalna | Sep 17, 2026 प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन नगरसेविका सायरा फखरूल्ला खान यांनी पुढाकार घेत नॅशनल नगर,गुलशन नगर गीतांजली कॉलनी, आणि डांगे कॉलनी परिसरात डास प्रतिबंधक फवारणी करून घेतली. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नगरसेविका सायरा फखरूल्ला खान यांनी परिसरातील परिस्थितीची दखल घेऊन फवारणीची मागणी केली. त्यानुसार महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि महानगरपालिक