मानगाव: माणगावजवळ एसटी बसची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू
Mangaon, Raigad | Apr 12, 2026 मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील रुद्रवली गावाच्या हद्दीत एसटी बसच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना सीएनजी पेट्रोल पंपाजवळ गोवा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. या अपघातात सागर साहदेव शिगवण (वय 35, रा. गणेशवाडी, पो. वीर, ता. महाड) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिगवण हे रस्ता ओलांडत असताना एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल ३८१४ वरील चालकाने बस अतिवेगाने व बेदरकारपणे चालवत त्यांना जोरदार धडक दिली.