जालना: जालना येथे शेख इब्राहीम यांच्यावरील चाकूहल्ला प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; औषधी खरेदी करीत असतांना झाला होता हल्ला
Jalna, Jalna | Mar 28, 2026 जालना शहरातील नुतनवसाहत परिसरात एका ठेकेदार शेख इब्राहीम यांच्यावर चार जणांनी चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर सध्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी हल्ला करणार्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख इब्राहीम शेख रसुल असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर रात्री सुमारे 9 ला घटना घडली.