नागपूर शहर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर होत्या. काल त्यांचे नागपुरात कार्यक्रम झाले आणि आज त्यांचा वर्धा येथे कार्यक्रम होता. त्यांचे हे कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या वर्धा येथून नागपूर विमानतळावर आल्या आणि वायुसेनेच्या विमानाने त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.