मोर्शी: जयस्तंभ चौकातील टिक्कस हॉटेल समोरून दुचाकी लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 14 ऑक्टोबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या टीकास हॉटेल समोरुन दुचाकी चोरून नेली असल्याची तक्रार दिनांक 12 ऑक्टोंबर ला रात्री दहा वाजून 26 मिनिटांनी अजय शेषरावजी ठाकरे राहणार मालवीय गार्डन मोर्शी, यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे