नागपूर शहर: नागपुरात 'लग्नाचं नाटक'; 'आजच लग्न लावू' म्हणत गुजरातच्या युवकाची फसवणूक, लुटेरी दुल्हन गँगचा पर्दाफाश
लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय युवकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नागपुरात एका मुलीशी भेट घालून देत आजच लग्न करूया असे सांगत वधू आणि तिच्यासोबत असलेल्या एका महिलेने युवकाकडून पैसे उकळले. मात्र, ऐनवेळी वधूचा कथित पती तिथे आल्याने या हायव्होल्टेज प्रकरणाचा पर्दाफाश झाला.या अचानक घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आणि संधी साधून दोन्ही महिला आरोपींनी तिथून पळ काढला.