अमरावतीत भाजपा–शिवसेना जागावाटप चर्चेला पेच; माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता बैठक सोडून बाहेर गेल्या आठ बैठकींतही निष्कर्ष नाही; युती तुटण्याच्या चर्चांना वेग अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या जागावाटपावरून भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा पेच निर्माण झाला आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतून माजी पालकमंत्री आणि शिवसेना नेते जगदीश गुप्ता हे संतप्त स्वरूपात बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी उपस्थितांना “राम राम” असा इशारा दिला