गोंदिया: वनविभाग गोंदिया व वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनीच्या वतीने वनमहोत्सव सप्ताह निमित्त तालुका क्रीडा संकुलात वृक्षारोपण
वनविभाग गोंदिया व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक अर्जुनीच्या वतीने वन महोत्सव सप्ताह निमित्त तालुका क्रीडा संकुल सडक अर्जुनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार बडोले,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पोलीस निरीक्षक गणेश वनारे , वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी.तरोने,क्षेत्र सहायक एस.के.पटले,अनिल मुनेश्वर, अरविंद मेंढे, भागवत लंजे, वनविभागाचे अभिकारी कर्मचारी व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.