वाशिम: अनसिंग येथील जिजामाता शाळेच्या बाजूला रस्त्याच्या मधोमध असलेली डीपी हलवा वीज वितरण कंपनी अनसिंग यांना निवेदन
Washim, Washim | Oct 15, 2025 अनसिंग शहरातील जिजामाता शाळेच्या बाजूला असलेल्या इंदिरा आवास गल्लीमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी एक वीज वितरण केंद्र (डीपी) उभारण्यात आलेले आहे. सदर डीपी रस्त्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा, तसेच स्थानिक नागरिकांच्या हालचालीस गंभीर अडथळा निर्माण होत आहे. सदर डीपीमुळे लहान मुलांना, महिला वर्गाला तसेच दोन व चारचाकी वाहनधारकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. अपघाताचा धोका सतत निर्माण होत असून, विशेषतः शाळेच्या वेळेत वाहतुकीचा अडथळा आण