नागपूर शहर: पाचपावली पोलिसांची मोठी कारवाई: विदेशी माउझरसह सराईत गुन्हेगार जेरबंद : राहुल मदने पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 4 जूनला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत मेहेदीबाग कॉर्नर परिसरातून मयूर किशोर आडतिया नावाच्या तरुणाला बेकायदेशीर विदेशी माउझर पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.पोलिसांच्या चौकशीत आरोपीने ही घातक शस्त्रे उज्जैनहून आणल्याची कबुली दिली आहे. बद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे