नागपूर शहर: माजी आर्मी कॅप्टनची १२ लाखांची सायबर फसवणूक; पोलिसांच्या तत्परतेमुळे ६.८० लाख परत : बळीराम सुतार पोलीस निरीक्षक
डिजिटल गुंतवणुकीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत असतानाच, नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ८२ वर्षीय निवृत्त आर्मी कॅप्टनची सायबर गुन्हेगारांनी सुमारे १२ लाख रुपयांची फसवणूक केली. मात्र, नागपूर सायबर पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत पीडिताचे ६ लाख ८० हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.