नागपूर शहर: मुख्यमंत्र्यांच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध!
नागपुरात पार पडलेल्या 'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या समारोप सोहळ्यात एक आगळावेगळा क्षण पाहायला मिळाला. महोत्सवानंतर प्रसिद्ध गायिका षण्मुखप्रिया यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान, षण्मुखप्रिया यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गुलाबी आँखे जो तेरी देखी' हे गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली.