नागपूर शहर: ऑपरेशन थंडर: ट्रकवर कारवाई; ३५ किलो गांजासह चालक गजाआड : अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 21 जून ला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई करत अमरावती-नागपूर रोडवर ३५ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयित ट्रकला अडवून पोलिसांनी ही कारवाई केली. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.