भंडारा: नादुरुस्त ट्रकला मोटरसायकलची धडक; चालक गंभीर जखमी! राष्ट्रीय महामार्गावर पलाडी येथील घटना
भंडारा तालुक्यातील नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी येथे मोटरसायकल व ट्रकचा अपघातात झाल्याची घटना आज दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. यात मोटर सायकल चालक गंभीर जखमी झाला आहे. प्रभाकर श्रीपत घोडमारे वय 62 रा. आमगाव हे. मो सा क्र MH 36 U 1375 ने भंडाऱ्यावरून स्व गावी जात असता पलाडी फाट्याजवळ उभा असणारा ना दुरुस्त ट्रक क्र. GJ 36 V 9992 ला मागेहून धडक दिली. त्यात प्रभाकर यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.