परळी: परळी जवळ असलेल्या मलकापूर शिवारात रेल्वे अपघात
Parli, Beed | Aug 11, 2024 परळी शहरापासून जवळ असलेल्या मलकापूर शिवारात रेल्वेखाली आल्याने एका मेंढपाळासह 22 मेंढ्या व दोन जनावरे ठार झाल्याची दुर्दैवी घटना, रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ मधुकर सरवदे व मुंजा डोणे राहणार उखळी हल्ली मुक्काम परळी हे दोघेही रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी जात होते. परळी हैदराबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारात अचानक समोरून आलेल्या मालगाडीने मेंढ्या व