वसई: वसई किल्ल्यातील बिबट्या जेरबंद
२५ दिवसानंतर वनविभागाला यश
Vasai, Palghar | Apr 23, 2024 मागील पंचवीस दिवसांपासून वसईकरांची झोप उडवीणारा बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मंगळवारी पहाटेच्या साडेतीनच्या सुमारास किल्ल्यात दहशत निर्माण करणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.२९ मार्चला वसईच्या किल्ल्यात बिबट्या आढळून आला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. याशिवाय या भागात नागरिकांना पर्यटनास बंदी घालण्यात आली होती.