नागपूर शहर: लकडगंज पोलिसांकडून दुचाकी चोर गजाआड; ३ वाहने जप्त: अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 25 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार,लकडगंज पोलिसांनी दुचाकी चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून ७५,००0 रुपये किमतीच्या ३ दुचाकी जप्त केल्या आहेत.गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजहर शेख यांच्या पथकाने सापळा रचून सुनील सेवकराव राहंगडाले या संशयिताला ताब्यात घेतले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार शिरसागर यांनी दिली आहे.