कल्याण: प्रेम प्रकरणातून तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन, घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर
Kalyan, Thane | Sep 28, 2025 डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियसीसोबत वाद झाल्याच्या रागातून ऋषिकेश नावाच्या तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले आहे.प्रियसीसोबत भांडण झाल्याच्या रागातून तो अकराव्या मजल्यावरून उडी मारण्यासाठी थांबला, त्यानंतर अग्निशमन दल,पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अर्ध्या तासाच्या विनवणीनंतरही तो परत गेला नाही,पोलिसांसमोर त्याने उडी मारून आपले जीवन संपवले. डोंबिवलीच्या राहुल नगर येथील घटना असून पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.