नागपूर शहर: कळमना हत्याकांडातील दुसरा आरोपी जेरबंद : निलेश कुलसंगे पोलीस उपनिरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश कुलसंगे यांनी 29 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार कलमना पोलीस ठाणे हद्दीतील डायमंड नगर, वांजरा येथे २४ एप्रिल रोजी रोशन धर्मसिंह उईके या तरुणाची चाकू व लाठ्यांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जावेद उर्फ लाल शकील अंसारी याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. तर, फरार असलेला दुसरा आरोपी शहबाज जहीर खान यालाही पोलिसांनी एका विशेष मोहिमेद्वारे दुसऱ्या जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत.